भारताच्या १.३ अब्ज लोकांचं भविष्य अनिष्टानी भरलेलं आहे!
मान्सून हा भारतीय जीवनाचा गाभा अन संस्कृतीचा पाया आहे. हा मान्सून लाखो शेतकऱ्यांच्या भविष्याचा रक्षणकर्ता आहे. तो तसाच लहरीदेखील आहे. मान्सूनचे आडाखे बांधणे कठीण होऊन बसलं असून त्याच्या तीव्रतेविषयी काही ठोसपणे सांगणंदेखील अवघड झालं आहे. सगळ्यात खेदाची या बाब म्हणजे सरकारच्या अतिशय संकुचित धोरणांनी या वातावरणीय बदलाच्या काळात लाखो लोकांना, विशेषतः गरिबांना हतबल करून सोडलं आहे.......